जिल्ह्यात गुरुवारी ४ हजार ११२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार ७९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर १३१४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ४१९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात २४२, आष्टी ४२, धारुर ९१, गेवराई ५४, केज १००, माजलगाव ७६, परळी १२३, पाटोदा ६६, शिरुर ६७ व वडवणी तालुक्यातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी १९ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात अंबिका चौक बीड येथील ४३ वर्षीय महिला, पंचशीलनगर येथील ४५ वर्षीय महिला, तेलगाव नाका, बीड येथील ७२ वर्षीय पुरुष काकडहिरा (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, नेकनूर (ता. बीड) येथील ७० वर्षीय महिला, भवानवाडी (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, देवदहिफळ (ता. धारुर) येथील ४१ वर्षीय पुरुष, आम्ला (ता. गेवराई) येथील ६५ वर्षीय पुरुष, सारणी (ता. केज) येथील ७५ वर्षीय पुरुष, होळ (ता. केज) ५८ वर्षीय महिला, एकदरा (ता. माजलगाव) ७० वर्षीय पुरुष, फुलेपिंपळगाव (ता. माजलगाव) ५० वर्षीय पुरुष, रोहतवाडी (ता. पाटोदा) येथील ७३ वर्षीय महिला, येथीलच ७० वर्षीय पुरुष, पाडळी (ता. शिरुरकासार) ६१ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील जैन गल्ली येथील ६६ वर्षीय महिला, दत्तपूर (ता. अंबाजोगाई) येथील ४६ वर्षीय पुरुष, बन्सीलाल नगर, अंबाजोगाई येथील ६७ वर्षीय पुरुष व आरणवाडी (ता. धारुर) येथील ८१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आता एकूण रुग्णसंख्या ६३ हजार ८१३ इतकी झाली असून यापैकी ५६ हजार १९० जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकूण बळींचा आकडा १०६३ इतका झाला असल्याची माहिती जि. प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.