बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर निराधारांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास २ लाख २४ हजार ६४३ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनाकडून तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी निराधारांकडून केली जात आहे.
केद्र आणि राज्य शानाच्या सयुक्त पद्धतीने निराधाराना प्रत्येक महिन्याला १ हजार रुपये दिले जातात. यातच राज्य शासनाकडून कोरोना पार्श्वभूमिवर अधिकचे १ हजार रुपये खात्यावर देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतना योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या पाच योजनेचे जवळपास २ लाख २४ हजार ६४३ लाभार्थी आहेत. राज्य शासनाच्या या घोषणेमुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, घोषणा केल्याप्रमाणे शासनाकडून १ हजाराची मदत तत्काळ करावी अशी मागणी कोली जात आहे.
लाभार्थी म्हणतात...
कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे आम्हाला कामही मिळत नाही. आर्थिक परिस्थिती बीकट झाली आहे. अशा परस्थितीत राज्य शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचे स्वागत आहे. मात्र, मदत लवकरात लवकर देण्यात यावी.
-लोचना खंडागळे
.............
गेल्या वर्षभरापासून कोरनामुळे सर्व व्यासाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नाही. पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे. राज्य शासनाने एक हजार रुपये देण्याचा घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
-बबन गालफाडे
......
शेतातील कामे देखील संपली आहेत. अशातच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. मोफत धान्य दिले तरी, इतर साहित्य पैसे देऊनच खरेदी करावे लागते. त्यामुळे घोषणा केल्याप्रकरणे एक हजाराची मदत देण्यात यावी.
-धोंडाबाई कांबळे
............
राज्य शासनाकडून संकटाच्या काळात आम्हाला जी एक हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. ती तोकडी आहे. महागाई वाढलेली असल्यामुळे राज्य शासनाने आणखी काही रक्कम देण्याचा विचार करावा.
-दत्तू जगताप
...................
निराधारांना आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून मदतीची घोषणा दिलासादायक आहे. मात्र, शासनाकडून यापूर्वी देखील अनेक घोषणा केल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले तसे या घोषणेचे होऊ नये. मदत खात्यावर लवकरात लवकर जमा करावी.
-गणेश काळे
...
संजय गांधी निराधार योजना - ५०२९८
श्रावणबाळ योजना १४४२६७
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना -२८९७५
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ७७३
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना ३३०