अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष व अशोक बडेरा परीवाराच्या वतीने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील विविध विभागास २० व्हील चेअर प्रदान करण्यात आल्या. यावेळी मुंदडा बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख व शहरातील मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांसाठी सातत्याने व्हील चेअरची कमी जाणवत असे. ही कमतरता
लक्षात घेवून सुभाष व अशोक बडेरा या बंधुंच्या परिवाराच्या वतीने रुग्णालयाच्या विविध विभागास २० व्हीलचेअर देण्यात आल्या. मेडिसीन विभागासाठी १०, सर्जरी विभागासाठी २, इएनटी विभागासाठी १, अर्थो विभागासाठी २ गायनिक विभागासाठी २तर लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटरसाठी २ आणि लोखंडी सावरगाव येथील मानसिक रोग निदान व उपचार केंद्रासाठी २ अशी विभागणी करण्यात आली आहे.
यासर्व व्हील चेअर या स्टेनलेस स्टील बनावटीच्या आणि उत्तम प्रतिच्या असून अशाच उत्तम प्रतीचे दोन स्ट्रेचर लवकरच देणार असल्याचे सुभाष बडेरा यांनी सांगितले. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, डॉ. राजेश कचरे, डॉ. शंकर धपाटे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. दिपक लामतुरे, डॉ. राकश जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. नितीन चाटे, डॉ. मनोज डोंगरे, डॉ. विश्वजित पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश अब्दागीरे, अधिसेविका उषा भताने, अधिक्षक राठोड, प्रतिष्ठित नागरीक गौतम सोळंकी, गिरीधारीलाल भराडिया, प्रा. नानासाहेब गाठाळ, डॉ. नरेंद्र काळे, शांतीलाल सेठिया, सारंग पुजारी, मयुर बडेरा, सुनील मुथा, प्रकाश सोळंकी, धनराज सोळंकी, हरीकिशन तापडिया, धनराज सोळंकी, दिलीप मुथा आदी उपस्थित होते.