लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.शेतकºयांना खरीप हंगामात पीककर्ज वाटपासाठी शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने अंमल सुरू केला. पावसाचा अंदाज असल्याने जूनपासून शेतकºयांनी पीक कर्जासाठी मागणी सुरु केली. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक कर्ज वाटपाला विलंब होत गेला. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी वेळोवेळी बॅँक अधिकाºयांची बैठक घेऊन पीक कर्जाच्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले होते. अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी समन्वय राखत बॅँकांना ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी पाठपुरावा केला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -२०१७ अंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी मिळाली, तर अनेक शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत कर्जमाफी संदर्भात दहा ग्रीन लिस्ट जाहीर झाल्या आहेत. संपूर्ण कर्जमाफी होणार या भरवशावर बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाची मागणी केली नाही. तसेच अनेक शेतकºयांकडे एकापेक्षा जास्त बॅँकांचे कर्ज आहे. त्यामुळे छाननी करुन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ राहिली.एमजीबी पुढे : इतर बॅँकांचे वाटप मात्र कमीमहाराष्टÑ ग्रामीण बॅँकेने ३५ हजार ३४२ शेतकºयांना २१३ कोटी ८७ लाखांचे सर्वाधिक पीककर्ज वाटप केले आहे. त्यापाठोपाठ एसबीआयने १६ हजार ७१ शेतकºयांना ११३ कोटी ६० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅँकेने ११हजार ७८४ शेतकºयांना ४४ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. एचडीएफसीने ९४८ शेतकºयांना ३५ कोटी ७२ लाखांचे तर बॅँक आॅफ महाराष्टÑने ५ हजार ७३३ शेतकºयांना ३१ कोटी ७० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाने १९८७ श्ोतकºयांना २० कोटी ७३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे.युको, सिंडीकेट, अॅक्सिस, युनियन, विजया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, देना, कॅनरा, बॅँक आॅफ इंडिया या बॅँकांकडील कर्जवाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत कमी आहे.....बीड जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जवळपास २५ टक्के असून ७८ हजार ६०० शेतकºयांना ५२५ कोटी ३ लाखांचे वाटप केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बॅँकांशी समन्वय राखून उद्दिष्टानुसार कर्जवाटपासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विजय चव्हाण,व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.
बीड जिल्ह्यात पीक कर्जाचे २४ टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:12 AM
जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
ठळक मुद्देवाया गेला खरीप : रबीच्या चिंतेमुळे मागणीचा ओघ थंडावला