लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धरणे आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू झाले. आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविल्या, अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली.जिल्ह्यातील दुष्काळी मागण्याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून हजारो शेतकरी बांधवांना गुराढोरांसह सोबत घेऊन बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण या गावच्या कोरड्या धरणात अनोखे असे धरणे आंदोलन सुरू केले होते. १६ व १७ नोव्हेंबर रोजी दिवस-रात्र त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी तरुण मंडळ व परिसराच्या गावातील नागरिक धरणे आंदोलनात सहभागी झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तालुक्यातील संघटना प्रमुख यांनी भेटी दिल्या. विविध गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक यांनी धरणे आंदोलनाला ग्रामपंचायतीचा पाठिंबा दिला. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन १७ नोव्हेंबर रोजी बीड तालुक्यात २५ गावांना पाण्याचे टँकर सुरू केले. तसेच जिल्हाधिकाºयांनी धरणे आंदोलनातील भेटी दिलेल्या प्रमुख मान्यवरांसोबत बैठक करून १७ नोव्हेंबर रोजी आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या शासनाकडे पाठवल्या आहेत. त्यामुळे पिंपरगव्हाण येथील शेतकरी बांधवांसोबत सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित करून मागे घेत असल्याचे राजेंद्र मस्के मित्रमंडळाचे प्रमुख राजेंद्र मस्के यांनी जाहीरकेले.मान्यवरांच्या भेटीआंदोलनात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या पाठिंबा देत मार्गदर्शन केले. यामध्ये शिवसेना ज्येष्ठ नेते माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार राजेंद्र जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, न प उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मराठा क्र ांती मोर्चाचे समन्वयक अशोक हिंगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयराजे पंडित, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, गणेश उगले, प्रल्हाद धनगुडे, गणेश वरेकर आदिंचा समावेश आहे.आंदोलनस्थळी कृषी अधीक्षक यांनी १५४ दिवस चारा पुरेल अशा खोटा अहवाल देऊन शेतकरी बांधवांची थट्टा केल्यामुळे संतप्त शेतकरी व महिलांनी त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलनस्थळी अंत्यसंस्कार केले.
आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:28 AM
धरणे आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू झाले. आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविल्या, अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली.
ठळक मुद्देआंदोलन स्थगित : इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात शासनाचे आश्वासन - राजेंद्र मस्के