बीड : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे २९९ नवे रुग्ण आढळले असून २४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ९८ इतकी झाली आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्येतही वाढ दिसून येत आहे. मंगळवारी २०५६ संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. २०५६ पैकी १७५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २९९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण बीड तालुक्यात १०४ आढळले. अंबाजोगाई तालुक्यात ८०, आष्टी तालुक्यात १५, गेवराईत १६, धारूरमध्ये ४, केजमध्ये ३०, माजलगावात १९, परळीत १४, पाटोदा तालुक्यात ७, शिरूरमध्ये ४ तर वडवणी तालुक्यात ६ रुग्ण आढळले.
२३०९८ बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत २३०९८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. तर ६११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार ७८ संशयितांचे नमुने तपासले. यापैकी २ लाख २६ हजार ९८० अहवाल निगेटिव्ह आले. १४१२ रुग्ण कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर एकूण २४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली.