बीड : खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्र-यांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.खरीप हंगाम २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना विमा दावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी वेळोवेळी आंदोलने केली. पुणे येथील ओरिएन्टल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर २५ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेतक-यांचे दावे का प्रलंबित आहेत तसेच तांत्रिक अडचणी विशद करुन उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी प्रधान कार्यालय दिल्ली व केंद्र शासनाकडून निर्णय आल्यानंतर नियमानुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रलंबित विमा दावे निकाली काढण्याच्या कामाला कंपनीने सुरुवात केली आहे. २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकºयांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा विमा वाटप करण्यात आल्याचे थावरे यांनी सांगितले.गाडी अडवून आंदोलनकंपनीचे उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी २५ नोव्हेंबर रोजी ४५ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार १५ जानेवारीला ४५ दिवस पूर्ण होतात. प्रलंबित सर्व दावे तोपर्यंत निकाली न काढल्यास उपमहाप्रबंधकांची गाडी अडवून आंदोलन करणार असल्याचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांना विम्याचे १६ कोटी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:04 AM