बीड : भारत संचार निगमच्या बीड जिल्ह्यातील तब्बल १०० अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज आता ५० अधिकारी सांभाळणार आहेत.भारत संचार निगमच्या योजनेनुसार ३१ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ९८ अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. तर अन्य दोघे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यात बीड, गेवराई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, परळी, केज उपविभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी ३० ते ३७ वर्षे सेवा केली आहे. एकाच वेळी १०० जण सेवानिवृत्त झाल्याने उपलब्ध ५० अधिकारी- कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढणार आहे.या संदर्भात टीडीएम (टेलीकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर) राजेश हेडाऊ म्हणाले, लवकरच वरिष्ठांचे निर्देश मिळतील त्याप्रमाणे कामकाजाचे नियोजन करु. उपलब्ध कर्मचारी, अधिकारी जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहतील.सेवापूर्ती सोहळा३१ जानेवारी रोजी झालेल्या सेवापूर्ती सोहळ्यात टीडीएम राजेश हेडाऊ, माजी टीडीएम पोकळे, माजी टीडीएम एम. व्ही. मुंडे, विभागीय अभियंता बी. एच. कांबळे, उपविभागीय अभियंता विलास सुपेकर, मुख्य लेखाधिकारी रवींद्र वडमारे, लेखाधिकारी गणेश ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी व्यासपीठावर होते.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप राऊतमारे, अनिल विश्वाद, आदर्श राठोड, राहुल सोनवणे, अण्णासाहेब कागदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
१०० कर्मचारी, अधिकारी एकाच दिवशी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:05 AM
भारत संचार निगमच्या बीड जिल्ह्यातील तब्बल १०० अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज आता ५० अधिकारी सांभाळणार आहेत.
ठळक मुद्देभारत संचार निगम लिमिटेड : ५० अधिकारी सांभाळणार आता जिल्ह्याचा कारभार