शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:17 AM

१९ जुलै २०१८ रोजी मयत सारिका संतोष जाधव हिला तिचा नवरा संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) याने रात्री ९.३० च्या दरम्यान दारू पिऊन मारहाण केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून सारिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष जाधव याला दोषी ठरवून २९ आॅगस्ट २०१९ रोजी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : नेहमीच दारू पिऊन पत्नीला देत होता त्रास

बीड : १९ जुलै २०१८ रोजी मयत सारिका संतोष जाधव हिला तिचा नवरा संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) याने रात्री ९.३० च्या दरम्यान दारू पिऊन मारहाण केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून सारिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष जाधव याला दोषी ठरवून २९ आॅगस्ट २०१९ रोजी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.आरोपी संतोष जाधव हा मयत सारिकाला नेहमीच दारू पिऊन शारीरिक व मानसिक त्रास देत असे. सततची होणारी मारहाण व त्रास सहन न झाल्यामुळे सारिकाने १९ जुलै २०१८ रोजी रात्री ९.३० दरम्यान अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत: पेटवून घेतले. तिची आरडाओरड ऐकून इतर नातेवाईकांना आग विझविण्याचा प्रयत्न केला व अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.या प्रकरणी सारिकाने २० जुलै रोजी रात्री २.० वाजता आरोपीच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत्युपूर्व जबाब दिला. त्यानंतर २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सारिकाचा भाऊ आजिनाथ नवनाथ गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) याने याबाबतची फिर्याद दिली. त्यावरून आरोपी संतोष बलभीम जाधव याच्या विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. डी. सिरसाट यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ते प्रकरण बीड येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी, पंच, मृत्युपूर्व जबाबप्रसंगीचे साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष ग्राह्य धरून, तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करून, अतिरिक्त जिल्हा व सरकारी वकील भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. डी.एन. खडसे यांनी आरोपी संतोष यास भादंवि कलम ३०६ अन्वये दोषी ठरविले. त्याला १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये आणि दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे भागवत एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना सर्व सहायक सरकारी वकील यांनी सहकार्य केले. या प्रकरणी कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. व्ही. व्ही. नागरगोजे, पो.ह. व्ही.डी. बिनवडे यांनी मदत केली.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्याCourtन्यायालय