शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:08 AM

अल्पवयीन मेव्हणीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय गोपाळ चांदणे (रा. बीड ) यास अपहरण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजेरा शेख यांनी सोमवारी सुनावली.

ठळक मुद्देबीड येथील प्रकरण : सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड : अल्पवयीन मेव्हणीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय गोपाळ चांदणे (रा. बीड ) यास अपहरण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजेरा शेख यांनी सोमवारी सुनावली.शहरातील शुक्रवार पेठ भागात राहणाऱ्या अक्षय गोपाळ चांदणे (२२) व संगीता (काल्पनिक नाव) यांचा २०१५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये स्टोव्हच्या भडक्याने ती जळाली होती. तिच्या उपचारासाठी बीडनंतर पुढील उपचार व प्लास्टिक सर्जरीसाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर भाजलेल्या संगीतासोबत तिची आई, पती अक्षय हे गेले होते. तर बीड येथे घरी संगीताची आजी, आजोबा आणि लहान बहिण सुनीता (वय १६, काल्पनिक नाव) हे होते. औरंगाबाद येथे उपचारादरम्यान अक्षय बीडला आला आणि मेव्हणी सुनीताला सोबत घेऊन पळून गेला. सुनीता बीडमधील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. संध्याकाळी सुनीता घरी आली नसल्याने तिच्या मावशीने तिच्या आईला कळविले. ६ आॅक्टोबर २०१६ रोजी हा प्रकार घडल्यानंतर शोधाशोध झाली. अक्षयने मेव्हणीला पळवून नेल्याची बाब समजल्यानंतर सुनीताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षयविरुद्ध अपहरणाचा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.दरम्यान अक्षय आणि मेव्हणी सुनीता हे पुणे येथे अक्षयच्या नातेवाईकाकडे राहिले. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी पेठ बीड ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. भोसले यांनी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत सुनीता ही ५ महिन्यांची गर्भवती असल्याची बाब निष्पन्न झाली. तर न्याय वैद्यक चाचणीत डीएनए नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने अक्षय व सुनीता यांचे संबंध स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणात कलम ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्ह्याचे कलम वाढले. तत्कालीन अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजिरा शेख यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान १२ साक्षीदार तपासले. यात तपासी अधिकारी भोसले, पीडितेची आई, पुणे येथील अक्षयचे नातेवाईक, सुनीता यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. दोष सिद्ध झाल्याने अक्षय चांदणे यास अपहरण केल्याप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अनिल धसे यांनी काम पाहिले.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयRapeबलात्कारjailतुरुंग