लोकमत न्यूज नेटवर्कधारुर / माजलगाव : येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच २०० ते ३०० पेक्षा जास्त ट्रेकर्सनी ट्रेकिंग केली. ट्रेकिंगमध्ये ८ वर्षापासून ते ६५ वर्षापर्यंतचे ट्रेकर्स सहभागी झाली होते. यात जाँबाज ट्रेकर्स माजलगाव, स्वराज्य ट्रेकर्स परभणी, किल्ले धारुर पत्रकार संघ, किल्ले धारुर युथ क्लब, कायाकल्प फाऊंडेशन, शिवतेज ट्रेकर्स यांच्या वतीने महादुर्ग किल्ले धारुर मोहीम संपन्न झाली. त्यानंतर या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती करून घेतली. धारुर येथील आठ वर्षाचा सत्यजीत दिख्खत हा ट्रेकर्ससाठी वाटाड्या ठरला. मार्ग निश्चिती व ट्रेकिंगच्या वेळी तो सर्वांत पुढे होता.२० जानेवारी रोजी अंबाचोंडी ते किल्ले धारूर पश्चिम दरवाजापर्यंतचे ४ कि.मी.चे खडतर अंतर ३ तासात खतरनाक ट्रेकिंगचा अनुभव घेऊन पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत विजयसिंहराव बप्पा सोळंके, माधव यादव, राजेश्वर गरुड, नीलेश काकडे, पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब सोळंके, युवराज लगड, धनराज धुमाळ, सचिन थोरात, नितीन जाधव, सचिन अंडील, धनंजय शिनगारे, मराठी पत्रकार परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, सचिनराव थोरात, हरीभाऊ मोरे, रामभाऊ शेळके, किल्ले धारुर युथ क्लब अध्यक्ष विजय शिनगारे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेशराव कापसे, सतीश वाकुडे, विश्वानंद तोष्णिवाल, गणेश थोरात, महेशराव गवळी, पवन धोत्रे, सुरेशराव गवळी, अविनाशराव चिद्रवार, अॅड.परमेश्वर शिनगारे, सत्यम वेदपाठक, मोहन गवळी, अक्षय डोंगरे, डॉ. परवेझ शेख, कृष्णा चाळक, महेश नासे, कृष्णा गिराम या युवकांसह विविध ठिकाणचे ट्रेकर्स सहभागी झाले होते.इतिहासात प्रथम या किल्ल्यात ट्रेकिंग होत असल्याने सर्वांसाठी ते आकर्षण होते. या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३०० ट्रेकर्संनी धारूर किल्ला केला सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:58 AM