शिरूर कासार : पोळा संपताच गणपती उत्सवाचे वेध सुरू होतात. विशेषत्वाने तरुण मंडळ यात जास्त सक्रिय असतात. गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत किमान दहा दिवस मोठा जल्लोष असतो. मात्र याही वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणपती मंडळांना ३३ कलमी निर्बंध सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी येथील पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंडळांनी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी केले. कोरोना निर्बंधांमुळे गणपती स्थापना व विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही. शिवाय मंडप उभारणीपासून मूर्ती किती उंचीची असावी अशा जवळपास ३३ नियमांची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस गणेश मंडळाचे संकेत थोरात, ॲड. सागर गाडेकर, दिनेश गाडेकर, विनोद पवार, मंगेश दगडे, अविनाश कदम, कृष्णा डोके, शुभम गोरे, कृष्णा फुंदे, आकाश खामकर आदींची उपस्थिती होती.
गणेशोत्सवासाठी ३३ कलमी निर्बंध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:39 AM