बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, शनिवारी ३७५ नवे रुग्ण आढळले, तर २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४,१९१ इतकी झाली आहे. शुक्रवारी २,७१३ संशयितांचे नमुने घेतले होते. शनिवारी प्राप्त अहवलानुसार २,३३८ नमुने निगेटिव्ह आले, तर ३७५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील ११२, अंबाजोगाई ७५, आष्टी ३०, धारूर १२, गेवराई २४, केज २७, माजलगाव २५, परळी ३८, पाटोदा २३, शिरूर ४, तर वडवणी तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात शनिवारी २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली.
आतापर्यंत जिल्ह्यात २४,१९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत २,५७,०१५ संशयितांची तपासणी झाली. २,३२,८२४ रुग्ण निगेटिव्ह तर २४,१९१ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर २१,९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
तीन दिवसांत सात जणांचा मृत्यू
२४ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६११ मृत्यूची नोंद होती, तर २७ मार्च रोजी प्राप्त अहवालानुसार मृत्युसंख्या ६१८ इतकी झाली. तीन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १३.१ तर मृत्युदर (फेटॅलिटी) २.५५ टक्के आहे. २४ मार्च रोजी हा मृत्युदर २.६४ टक्के होता.