शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान अनुदानाचे ३८३ कोटी जमा, २३९ बाकी

By शिरीष शिंदे | Published: September 27, 2023 7:14 PM

ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होतेय जमा

बीड : मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस तर मार्च व एप्रिल २०२३मधील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. सदरील चार ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयाद्वारे ८ लाख १४ हजार ३६ शेतकऱ्यांना ६२२ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी अनुदान ४ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून, २३९ कोटी रुपये बाकी आहेत. शासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.

पूर्वी जिल्हा स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले जात असे, परंतु यावर्षीपासून राज्य स्तरावरून अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, त्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअर अपलोड केल्या जातात; परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने ई-केवायसी असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ७८ हजार ३६४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३८३ कोटी ५ लाख रुपये अनुदान जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.

व्हिके लिस्ट तलाठ्यांकडे उपलब्धव्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादी नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती अनुदान स्थितीकालावधी-बाधित शेतकरी-नुकसान रक्कम (कोटीत)-खात्यावर जमा रक्कमअतिवृष्टी २०२२-३५१६३४-४१०.२२-२८७.५५सततचा पाऊस २०२२-४३७६८८-१९५.०३-८९.६१अवकाळी पाऊस मार्च २०२३-८५०३-५.९९-१.८०अवकाळी पाऊस एप्रिल २०२३-१६२११-११.३२-४.०९एकूण-८१४०३६-६२२.५८-३८३.०५

देर आये दुरुस्त आयेमागच्या वर्षी शासनाने जीआर काढून मंजूर केलेली अनुदानाची रक्कम आत बँक खात्यावर जमा केली जात आहे. वास्तविकत: ही मदत शासनाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने उशिरा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मागच्या तीन महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. अशी बिकट स्थिती असताना अनुदानाची रक्कम अनेकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अद्याप निम्मी रक्कम जमा होणे बाकी आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यावर जमा होईल. यासोबतच किती रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे हे सुद्धा समजून येईल. ई-केवायसीमुळे किती रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे याचा उलगडा होईल.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी