शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

By सोमनाथ खताळ | Published: August 30, 2024 12:17 PM

मग आष्टीत धस, धोंडे, गेवराईत पंडित अन् बीडमध्ये मस्के, जगतापांचे काय?

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी चार जागा राष्ट्रवादीच्या आणि सहाही जागा महायुतीच्या विजयी होतील, असा वादा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केला. मग आष्टीत भाजपचे इच्छुक असलेले माजी आ. सुरेश धस, भीमराव धोंडे, गेवराईत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित तर बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे काय होणार? असा प्रश्न आहे. मुंडे यांच्या वक्तव्यामुळे इच्छुक उमेदवारांची कहीं खुशी, कहीं गम अशी अवस्था झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारी सकाळी बीडमध्ये आले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभा झाली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत काही सुचक वक्तव्य केले. जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. पैकी चारही जागा राष्ट्रवादीच्या आणि सहाही जागा महायुतीच्या निवडून येतील असे सांगितले. सध्या जिल्ह्यात केज व गेवराईत भाजपचे तर परळी, आष्टी आणि माजलगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. बीडमध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत. या जागेवरही अजित पवार गटानेच दावा केल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

बीडमध्ये युतीचे तिघेही इच्छुकबीडची जागा युती असताना शिवसेनेसाठी असायची. राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत होत असे. परंतु आता हे दोन्ही पक्ष युतीत आले आहेत. येथे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तर अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर उमेदवारीचा दावा करत आहेत. सध्या एकत्र असताना राष्ट्रवादीचा आमदार असल्याने अजित पवार गट यावर दावा करत आहे. तर शिवसेनेसाठी ही जागा आतापर्यंत होती, असे म्हणत शिंदे गट दावा करत आहे.

अमरसिंह पंडितांना काय म्हणाले?सध्या गेवराईत भाजपचे आमदार आहेत. याच ठिकाणी अजित पवार गटाचे जि. प. माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित इच्छुक आहेत. या जागेबद्दल बोलताना पालकमंत्री मुंडे यांनी माजी आ. अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहून 'तुमचा विशेष विचार केला जाईल' असे म्हणत उमेदवारीचे संकेत दिले.

भाजपचे इच्छुक अस्वस्थबीडसह माजलगाव, आष्टी आणि परळीची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे संकेत धनंजय मुंडे यांनी दिले. त्यामुळे या मतदारसंघातील भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केजमध्ये अजित पवार गट व शिंदे गटाचे फारसे इच्छुक नाहीत, परंतु गेवराईतून पंडित इच्छुक आहेत.

कोणत्या मतदारसंघात काय अवस्थाआष्टी मतदारसंघविद्यमान आमदार - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी अजित पवार गट)भाजपचे इच्छुक - सुरेश धस, भीमराव धोंडे

गेवराईविद्यमान आमदार - लक्ष्मण पवार (भाजप)अजित पवार गटाचे इच्छुक - विजयसिंह पंडित

बीडविद्यमान आमदार - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार गट)अजित पवार गटाचे इच्छुक - डॉ.योगेश क्षीरसागर, बळीराम गवते, तय्यब शेखभाजपचे इच्छुक - राजेंद्र मस्केशिवसेना शिंदे गटाचे इच्छुक - अनिल जगताप

केजविद्यमान आमदार - नमिता मुंदडा (भाजप)अजित पवार गटाचे इच्छुक - सध्या तरी प्रबळ दावेदार कोणी नाही

माजलगावविद्यमान आमदार - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी अजित पवार गट)भाजपचे इच्छुक - रमेश आडसकर, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे, बाबरी मुंडेशिवसेना शिंदे गटाचे इच्छुक - तुकाराम येवलेअजित पवार गटाचे इच्छुक - जयसिंह सोळंके, अशोक डक

परळीविद्यमान आमदार - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार गट)भाजप - प्रबळ दावेदार नाहीशिवसेना शिंदे गट - प्रबळ दावेदार नाही

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार