शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

अनेकांनी प्रॉपर्टी हडप करुनही भगवानगडाकडे ४०० एकर जमीन: महंत नामदेव शास्त्री 

By अनिल लगड | Updated: September 12, 2022 13:47 IST

भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली.

बीड : संत भगवानबाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या सहकार्याने भगवानगडाचा विकास सुरू आहे. मागील काळात औरंगाबाद येथील भगवानगडाची प्रॉपर्टी काहींनी हडप केली. परंतु भाविकांची अपार श्रध्दा, त्यांनी केलेली मदत व सहकार्यामुळे भगवानगडाला काही फरक पडला नाही. आजही  भगवान गडाकडे ३५० ते ४०० एकर जमीन शिल्लक आहे, असे वक्तव्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.   गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी महंत शास्त्री यांची ग्रामस्थांनी रथातून मिरवणूक काढली होती. यावेळी महंत शास्त्री बोलत होते.संत भगवान बाबा चकलंब्यात घोड्याच्या तांग्यानी यायचे आणि चकलांब्यातून पुढे बसने जायचे. भगवान बाबांच्या इतक्या जवळचे गाव मधल्या काही काळात थोडे दूर झाले होते. पण आज तो सर्व दुरावा तुम्ही गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन भरून काढला, असे बोलून महंत शास्त्रींनी तरुणांसह गावकऱ्यांचे कौतुक केले. 

संत भगवानबाबांचे औरंगाबाद येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासू सहकारी  होते. आज ते हयात नाहीत. त्यांच्यावर इतका विश्वास होता की, ते शिकत असताना त्यांनी बाबांना घड्याळ मागितले होते. यावेळी भगवानबाबांनी स्वत:च्या हातातील घड्याळ लगेच काढून त्यांना दिले होते. यानंतर  ‘ते’ सहकारी गडाचे विश्वस्त झाले. भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली. तरीही गडाला काहीही फरक पडला नाही. आजही गडाकडे भरपूर जमीन शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जागाही हडपण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला होता. परंतु तो प्रयत्न तेथील भाविकांनी हाणून पाडला, असेही महंत शास्त्री यांनी यावेळी सांगितले. भगवान गडावर अशी अनेक संकटे आली. तरी ती बाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या मदत व सहकार्याने ती दूर झाली. यामुळे आजही भगवानगडाची विकासाकडे वाटचाल आहे, असेही शास्त्री म्हणाले.

गरज पडेल तेव्हा चकलांब्याचा निधी घेईलभगवान गडाच्या विकास कामासाठी चकलांबा ग्रामस्थांची विकास निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नामदेव शास्त्री यांनी सांगितले की, आता नको. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस घेईल, असे सांगितले.

टॅग्स :Beedबीडsocial workerसमाजसेवक