शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

बोगस रॉयल्टी दाखवून केला ४ हजार ब्रास मुरूम उपसा; व्हायरल व्हिडीओनंतरही कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 3:34 PM

सदरील ठिकाणचा व तलाठी यांनी भेट दिलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माजलगाव ( बीड): पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने मागील सहा महिन्यापासून मुरूमासाठी रॉयल्टी देणे बंद आहे. मात्र, एका व्यक्तीने बोगस रॉयल्टी दाखवून तालखेड परिसरातून जवळपास चार हजार ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केले आहे. त्याचबरोबर एका शेतातून देखील मुरूम घेऊन जात असताना शेतकऱ्यांनी जेसीबी, ट्रॅक्टर पकडले. याची माहिती महसूल विभागाला देऊन तीन दिवस उलटले तरी कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील गट नंबर 500 मधून मागील अनेक दिवसापासून मुरुमाची बोगस रॉयल्टी दाखवत मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु आहे. मुरूम माफियांनी आप्पासाहेब नानाभाऊ वरपे यांच्या अर्ध्या एकर शेतामधून देखील मुरूम उत्खनन करू लागले. ही माहिती कळताच शेतकऱ्याने जेसीबी व ट्रॅक्टर पकडले होते. याबाबत महसूल विभागाला माहिती दिली. त्यानंतर तलाठ्याने येऊन फक्त पाहणी केली. पंचनामा करू नये असे तहसीलदार यांनी सांगितल्याचे तलाठ्याने म्हटले. यादरम्यान माफियांनी ट्रॅक्टर फरार केले. तर तीन दिवसांपासून जेसीबी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. परंतु, तीन दिवस उलटून देखील महसूल विभागाने यावर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही.

व्हिडिओ व्हायरल तरी कारवाई नाहीसदरील ठिकाणचा व तलाठी यांनी भेट दिलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंरही महसूल विभागाने काहीच कारवाई केली नाही. दोन ओळीचे पत्र लिहून द्या, सदरील जेसीबीचा फोटो काढा असे शेतकरी सांगत असताना तलाठी उद्धट भाषा वापरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत येथील तहसीलदार वर्षा मनाळे यांना विचारणा केली असता, त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न करत केले. काल बीड येथे मिटींग होती. आज सुट्टी असताना देखील आम्ही पंचनामा करण्यास पाठवले आहे अशी माहिती दिली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागBeedबीड