लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : मध्यंतरी थंडावलेला कोरोना मार्चमध्ये पुन्हा दुसरी लाट घेऊन आला. मार्च ते १८ मे पर्यंत तालुक्यातील विविध गावातील पाच हजार नऊशे लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार हजार सातशे पन्नास जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आष्टी तालुक्यात मागील वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात होती. त्यातच प्रशासनाने नियम घालून देखील याकडे नागरिकांनी पालन न केल्याने व मला काय होतय... हे मनात असल्याने दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत गेली. मार्च ते १८ मे या कालावधीत तालुक्यातील विविध गावातील पाच हजार नऊशे लोकांना कोरोनाची लागण झाली. यातून आरोग्य विभागाच्या दिवसरात्र मेहनत व जनजागृतीतून ४,७५० कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १,१३२ कोरोना बाधित उपचार घेत आहेत,
...
गावोगावी आरोग्य विभाग, प्रशासन जनजागृती करीत आहे. तरी देखील नियमाचे उल्लंघन केले जात असल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून स्वत: सोबत कुटुंबाची काळजी घ्यावी.
- डॉ. नितीन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी.