शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

बाजारकरूंचा टेम्पो उलटून २३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:30 PM

केज तालुक्यातील जिवाची वाडी येथून वडवणी येथील आठवडी बाजाराला प्रवासी व सामान घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने होऊन २३ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देएक गंभीर : केज तालुक्यातील जिवाचीवाडी जवळ अपघात

येवता : केज तालुक्यातील जिवाची वाडी येथून वडवणी येथील आठवडी बाजाराला प्रवासी व सामान घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने होऊन २३ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.वडवणी येथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. सकाळी ८ वाजता जिवाची वाडी येथून २३ प्रवासी आणि बाजारकरुंचे कोंबड्या, शेळ्या, धान्य आदी सामान घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. २०, एफ ६३७६) निघाला होता. गावापासून एक किमी अंतरावर चालक राणाबा दगडू चौरे याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील सर्व प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना स्वारातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.या अपघातातील जखमींमध्ये केशरबाई बजरंग शिंदे, संजीवन बारिकराव चौरे, छत्रभुज विठ्ठल कुटे, लक्ष्मण गोपाळ चौरे, सुमित्रा बप्पाजी खाडे, वचिष्ट काशीनाथ चौरे, राणबा दगडू चौरे, निलावती दगडू चौरे, कमल महादेव खाडे, सूर्यकांत मारु ती चौरे, संपती गणपती खाडे, शिवकन्या लक्ष्मण चौरे, विकास राणबा चौरे, अर्चना बालासाहेब चौरे, आशाबाई बालू मैंद, बाळकृष्ण दगडू चौरे, हरी लक्ष्मण कुटे, ज्ञानेश्वरी बालासाहेब चौरे, अंजना आसाराम खाडे यांचा समावेश आहे.रोहतवाडी फाटा येथे अपघात; एक ठारपाटोदा : तालुक्यातील रोहतवाडी फाटा येथे ३१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी तीन वाजता शिवशाही बस व दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.नवनाथ वामन सानप (वय ५० वर्षे, रा. खडकवाडी, ता. पाटोदा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ३१ डिसेंबर रोजी गावाकडे दुचाकी (एमएच २३ पी २४२३) वरुन जात होते. यावेळी त्यांच्यापुढे शिवशाही बस (एमएच ९ ईएम ९९७१) ही जात होती. दरम्यान, रोहतवाडी फाट्यावर बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे नवनाथ यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाटोदा ठाण्यात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मोटे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातhospitalहॉस्पिटल