लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. त्यानुसार आचसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. या क्षेत्रात प्रशासनाच्या वतीने ६ मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. त्याच्यावर विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.यावेळी तहसीलदार किरण अंबेकर, माहिती अधिकारी किरण वाघ, नायब तहसिलदार नागरगोजे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना टिळेकर म्हणाले, बीड विधानसभा मतदारसंघात स्त्री १ लाख ५६ हजार १०४ पुरुष मतदार १ लाख ७८ हजार ४८२ व इतर ३ असे मिळून ३ लाख ३४ हजार ५८९ तसेच सैन्य दलातील मतदार ८१४ आहेत. यासाठी ३६६ मतदार केंदे्र असणार आहेत. तसेच आणखी ८ मतदार केंद्रांची मागणी करण्यात आलेली आहे.शहरी भागात १४६ तर ग्रामीण भागात २२८ मतदारकेंदे्र असणार आहेत. या कालावधीमध्ये मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या २२४५ असणार आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इतर तालुक्यात दुसºया प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.दरम्यान सर्व ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. निवडणूक कालावधीमध्ये त्यांना कार्यकारी दंडाधिकाºयाचे अधिकार बहाल केलेले असणार आहेत.त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.मतदारसंघातील मांजरसुंबा, नाळवंडी, नवगण राजुरी, चौसाळा याठिकाणी बैठे पथक असणार आहेत. त्यांचे लक्ष या मार्गावरून जाणाºया गाड्यांवर असणार आहेत.तसेच भरारी पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे लक्ष सर्व घडामोडींवर असणार आहे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे देखील टिळेकर यावेळी बोलताना म्हणाले.२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील बाबळवाडी, बकरवाडी, नवगण राजुरीचे दोन , आवलवाडी, वायभटवाडी या गावांमध्ये ९० टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. त्यापैकी ७५ ते ८० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले होते. त्यामुळे या गावातील बुथवर विशेष लक्ष असणार आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात ६ मतदान केंद्रे संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:29 AM