जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४१९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३६६ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५३ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १९, बीड १६, शिरूरकासार ६, परळी ५, केज ३ तसेच आष्टी, धारूर, गेवराई, पाटोदा तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. तसेच रविवारी २७ जण कोरोनामुक्त झाले. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४१६ एवढी झाली आहे. पैकी १७ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८ हजार ४४९ सशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली, पैकी १ लाख ९० हजार ३३ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात ११३८ खाटा उपलब्ध
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८ रुग्णालयांमध्ये ११३८ खाटांची क्षमता आहे. सध्या २६८ खाटांवर संशयित व बाधित अशा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर सर्व खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.