शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

६९६ निवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांना उपदानासह वेतनवाढीचा फरक मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:28 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकरारानुसारच्या लाभापासून होते वंचित : ६ कोटी ६४ लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा

बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ६९६ कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने १ एप्रिल ते ३१ मार्च २०२० पर्यंतची वेतनवाढ जाहीर केली होती. या संदर्भात ४ सप्टेंबर २०१८ रोजी पत्राद्वारे थकीत रकमेपैकी पाच हप्ते नोव्हेंबरच्या वेतनाबरोबर देण्याचे तसेच उर्वरित थकीत रक्कम डिसेंबर २०१८ च्या वेतनापासून ४३ हप्त्यांमध्ये दरमहा वेतनाबरोबर देण्याचे आदेश काढले. १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, ते कराराच्या लाभासाठी पात्र असताना त्यांचा विचार झाला नव्हता. त्यामुळे या कर्मचाºयांना वेतन निश्चितीचा व पाच हप्तयांमधील उपदान, पेन्शन, शिल्लक रजा आणि वेतनवाढीचा कोणताही लाभ मिळत नव्हता. राज्यातील जवळपास १० हजार तर बीड विभागातील ५०० पेक्षा जास्त कर्मचारी या लाभापासून वंचित राहिले होते. या संदर्भात ‘लोकमतने १९ सप्टेंबर २०१८ रोजी एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना वेतनवाढ नाही, १० हजार कर्मचारी पात्र असुनही वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान या सेवानिवृत्त कर्मचाºयांचा विषय राज्य परिवहन महामंडळाकडे गेल्यानंतर लाभ देण्याबाबत निर्णय झाला, मात्र लागणाºया निधीचा प्रश्न होता.१ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना अखेर फेब्रुवारी २०१९ पासून लाभ देण्याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करत कार्यवाही सुरु झाली. विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय लेखाधिकारी नारायणराव मुंडे, लेखाकार प्रकाश क्षीरसागर, अमर टाकसाळ, गणेश भिल्लारे, गणेश चव्हाण, आर. एस. सय्यद, अर्जुन ठोंबरे, श्रीधर आबूज आदींनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केली. ६९६ कर्मचाºयांना एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.बीड विभागातील ३१२ कर्मचाºयांना २२ फेब्रुवारीदरम्यान उपदानाची रक्कम वाटप करण्यात आली. जवळपास २ कोटी ८४ लाख रुपयांचे उपदान वाटप करण्यात आले.तसेच लागणारा निधी उपलब्ध होताच १६ ते २० मार्च दरम्यान ३८४ कर्मचाºयांना वेतनवाढीतील फरकाचे ३ कोटी ८० रुपये त्यांच्या एस. टी. को. आॅप. बॅँक आणि एसबीआयधील खात्यावर जमा करण्यात आली.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटी