लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुरुवारी परळी येथे ६ तर बीडमध्ये २ विद्यार्थ्यांवर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली.
गुरुवारी इंग्रजीचा पेपर होता. या पार्श्वभूमीवर परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपी प्रतिबंध करण्यासाठी महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र भरारी पथकांची संख्या अपुरी असल्याने काही केंद्रांवर कॉप्यांचा वापर झाला. तसेच केंद्रसंचालकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. दरम्यान निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, विस्तार अधिकारी तुकाराम पवार यांच्या भरारी पथकाने परळी येथील थर्मल कॉलनीतील न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर तपासणी केली. या वेळी कॉपी बाळगणाºया २ विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले. तसेच या पथकाने इम्दादुल उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रावर ४ कॉपी बाळगणाºया ४ विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले.
बीड येथील मिल्लीया गर्ल्स हायस्कूल केंद्रावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली.