- संजय खाकरे
परळी (जि. बीड) : पाच विभागांतील ६० जणांच्या महापथकाने डॉ. सुदाम मुंडे याच्या दवाखान्याची झाडाझडती घेतली. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. या पथकात आरोग्य विभागातील वैद्यकीय आधिकारी, सात कर्मचारी, दोन पोलीस निरीक्षक, ३० पोलीस अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हाधिकारी यांच्यासह महसूलचे १५ अधिकारी, कर्मचारी, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक आणि महावितरणचे चौघे होते.
डॉ. सुदाम मुंडे याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात औषधसाठा, पोर्टेबल एक्स-रे मशीन, गर्भपातासाठी आवश्यक असणारी उपकरणे, नेबुलाईझर व आॅक्सिजनच्या प्रत्येकी दोन मशीन आढळून आल्या. पथकाने हे सर्व साहित्य सील केले. तसेच यावेळी चार रु ग्ण उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे दिसून आले.
कोरोनासदृश रुग्णांवरही करायचा उपचारकुठलीही परवानगी नसताना संशयित रुग्णांची तपासणी करून इंजेक्शन द्यायचे. त्यानंतर गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन द्यायचे. मात्र, त्यावर हॉस्पिटलचा उल्लेख नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासदृश रु ग्णांवरही त्याने उपचार सरू केले होते. मास्क वापरण्यास त्याचा विरोध होता. येणाऱ्या रुणांना इंजेक्शन द्यायचे आणि रोग बरा होतो, असे सांगून संशियत रु ग्णांना तो दिलासा देत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गर्दी वाढली होती.
पथकात कोण होते?पथकात उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे, परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, प्रमुख डॉ. बालासाहेब मैड, अन्न व औषध निरीक्षक डोईफोडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.या ६० जणांच्या पथकाने रात्रभर सुदाम मुंडेच्या रुग्णालयाची झाडाझडती घेतली.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखलबेकायदेशीरपणे प्रॅक्टिस केल्याप्रकरणी शनिवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री छापा मारून कारवाई करण्यात आली. डॉ. सुदाम मुंडेविरुद्ध इंडियन मेडिकल काऊन्सिल अॅक्ट १९५६ चे १५(२), महाराष्टÑ मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६१ चे कलम ३३(२) आणि भादंविचे कलम ३५३, २६९, २७०, २७८, ४१९, ४२०, १७५, १७९, ५०४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(बी), साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम २, ३, ४ वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ३, ४, ५ मुंबई सुश्रूषा नोंदणी कायदा १९४९ कलम ३ (२) प्रमाणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.