बीड : चालु महिन्यात पहिल्यांदाच केवळ सहा तासांत तब्बल ६६ बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी परळी उपजिल्हा रूग्णालय, धर्मापुरी व आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन या शस्त्रक्रिया केल्या.कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात बीड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. तसेच सुरक्षित मातृत्व अभियानात बीड राज्यात अव्वल आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग यशस्वी कामगिरी करीत आहे. कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी खुद्द डॉ.थोरात यांचा पुढाकार असतो. आतापर्यंत त्यांनी दीड हजारांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. मध्यंतरी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या शस्त्रक्रियाचा आकडा घसरला होता. मात्र मार्च महिन्यात पुन्हा हा आकडा वाढला आहे. गुरूवारी केवळ सहा तासात तब्बल ६६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परळी उपजिल्हा रूग्णालयात ४०, धर्मापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ तर आडस प्रा.आ.केंद्रात ११ अशा ६६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सहा तासांत ६६ कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:04 AM
चालु महिन्यात पहिल्यांदाच केवळ सहा तासांत तब्बल ६६ बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देपरळी, धर्मापुरी, आडस येथे जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट