बीड : निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु काही ठिकाणी ६ वाजता मतदान केंद्रावर मतदार रांगेत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपला मतदान करता यावे यासाठी म्मतदानाची प्रक्रिया १ तास उशीरापर्यंत चालली होती. बीड लोकसभा क्षेत्रात एकूण ७२ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोक रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालली.निवडणूक विभागाने मतदान करण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंतची वेळ मर्यादा घालून दिली होती. मात्र, बीड, शिरुर, आष्टी, माजलगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मतदानावर बहिष्कार घेतला होता.ही माहिती प्रशासनास कळल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदानास सुरुवात झाली.तर काही ठिकाणी उत्सर्फूतपणे मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे त्या मतदान केंद्रवर मत देता आले नव्हते. मात्र, नागरिक रांगेत उभेच होते यंत्राची दुरुस्थी झाल्यानंतर मतदानास सुरुवात झाली होती. असे असले तरी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु ६ वाजता मतदान केंद्रावर रांगेत असलेली शेवटची व्यक्ती मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार होती.त्यानुसार नागपूर शहरात एकूण ३८ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोकं रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालल्याचे दिसून आले.
बीड जिल्ह्यात ७२ ठिकाणी सुरु होते सायं. ६ नंतरही मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:17 AM
निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु काही ठिकाणी ६ वाजता मतदान केंद्रावर मतदार रांगेत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपला मतदान करता यावे यासाठी म्मतदानाची प्रक्रिया १ तास उशीरापर्यंत चालली होती.
ठळक मुद्देमतदान प्रक्रिया चालली ७ ते ७.३० पर्यंत : रांगेतील उभ्या प्रत्येकाने बजावला हक्क