गेल्या काही दिवसांपासून आजींना खोकला व ताप येऊ लागल्याने त्यांची तपासणी केली असता कोरोनाबाधित आढळून आल्याने आजींच्या उपचारासाठी मुलांनी वणवण सुरू केली. बेड व दवाखान्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने संपर्कातील डाॅक्टर डाॅ. अशोक बांगर यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगत धीर दिला आणि घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आजीबाईंनी १५ दिवस घरीच राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. कोरोना काळात मृत्यूदर वाढला असताना वृद्धापकाळात घरीच उपचार करून कोरोनामुक्त हाेणाऱ्या आजीबाईंचे उदाहरण इतर रुग्णांचे मनोबल वाढविणारे आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून खचून न जाता आपली जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी, असे आजीने यातून सिद्ध करून दाखविले आहे.
===Photopath===
100521\img-20210508-wa0628_14.jpg