शिरूर कासार : तालुक्यात ७३२ दुकानदारांनी मुदतीत कोरोना चाचणी करून घेतली, तर तपासणी रिपोर्ट पाहून लावलेले सील काढून घेत दुकान सुरू झाले असल्याची माहिती नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिली .
‘कोरोना’ प्रतिबंधासाठी सर्व व्यापारी यांना तपासणी करून घेण्याचे सुचविले होते आणि सुजान व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत, सुमारे ७३२ व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत टेस्ट करून घेतली. या सर्वांचे रिपोर्ट पाहून खात्री करत असताना, अवघ्या दोन दुकानदारांनी टेस्टिंग करून घेतली नसल्याचे निष्पन्न झाले होते. लागलीच कारवाई आणि नंतर तपासणी केल्याने दुकान सुरू करता आली. बंद केलेले कोरोना केअर सेंटर रुग्णवाढ होत असल्याने सुरू करावे लागले. महसूल, पोलीस, आरोग्य, तसेच नगरपंचायत प्रशासन पुन्हा या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तहसीलदार श्रीराम बेंडे हेही रस्त्यावर फेरफटका मारून नागरिकांना वारंवार आवाहन करत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शास आल्यास कुणालाही पाठीशी न घालता कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
===Photopath===
220321\58221930vijaykumar gadekar_img-20210322-wa0033_14.jpg~230321\582723bed_2_23032021_14.jpg
===Caption===
सील केलेली दुकाने पुन्हा केली खुली~