शिरीष शिंदे, बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबर हा दिवस बीज प्रक्रिया व ई-केवायसी दिन म्हणून कृषी विभागाच्या वतीने साजरा केला जाणार आहे. सदरील एकाच दिवशी जिल्हाभरात ७४० ठिकाणी मेळावे घेतले जाणार असून त्या माध्यमातून बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक पीएम किसानसाठी ई-केवायसी करून घेतली जाणार आहे.
गाव निवडताना प्रथमत: ग्रामपंचायत मुख्यालयाचे गाव घेतले जाईल. सकाळी आठ वाजता पहिले गाव, दुपारी एक वाजता दुसरे गाव आणि सायंकाळी साडेपाच वाजता तिसरे गाव अशा पद्धतीने एका दिवसात तीन गावे मोहिमेमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावांची संख्या जास्त असल्यास सदर मोहीम दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी राबवली जाणार आहे. काही गावात कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी हेदेखील कॅम्प आयोजित करतील. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व ई-केवायसीसाठी पुढे यावे आणि लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे. दरम्यानच्या काळात मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून कोणत्या गावात कोणत्या दिवशी कोण क्षेत्रीय कर्मचारी बीज प्रक्रिया व ई-केवायसी कॅम्पसाठी उपस्थित राहणार याची यादी विविध गावांमधील व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रसारित केली जाणार आहे.असे होतील मेळावेबीड : ११४पाटोदा : ४१आष्टी : ५९शिरुर कासार : ४३माजलगाव : ३३गेवराई : ८१धारूर : ५८वडवणी : ३६अंबाजोगाई : ९२केज : १०८परळी : ७५एकूण : ७४०