शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महाराष्ट्रातील ७५ टक्के मराठा समाज ओबीसीमध्येच; मनोज जरांगे पाटील यांचा दावा

By शिरीष शिंदे | Published: September 27, 2023 7:15 PM

मराठवाडा व इतर काही भाग वगळता विदर्भ, खान्देश, नाशिक, इंदापूर, कोकण पट्टा भागातील कुणबी मराठे ओबीसी आरक्षणामध्ये

बीड : १९२३ ते १९८९ पर्यंत कुणबी मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये होता. १९९० मध्ये मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून बाहेर काढण्यात आले. ७५ टक्के कुणबी मराठा आधीच ओबीसीमध्ये गेलेला आहे. मराठवाडा व इतर काही भाग वगळता विदर्भ, खान्देश, नाशिक, इंदापूर, कोकण पट्टा भागातील कुणबी मराठे ओबीसी आरक्षणामध्ये असल्याचा दावा अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नगद नारायण गडावर जरांगे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी मंगळवारी संवाद साधला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, दिलीप गोरे, गंगाधर काळकुटे यांची उपस्थित होती. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत आहे या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, काही व्यक्ती ओबीसी बांधवांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर आपल्या आरक्षणाला धक्का लागेल असे ओबीसींना सांगितले जात आहे. परंतु, त्यांना कोणी तरी समजून सांगण्याची गरज आहे की, राज्यातील ७५ टक्के कुणबी मराठा समाज ओबीसीमध्येच आहे. काही भाग वगळला तर सर्व मराठा बांधव ओबीसीमध्ये आहेत. त्यामुळे सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहे. सामान्य मराठे व सामान्य ओबीसी बांधव एकच आहेत.५ हजार कुणबी प्रमाणपत्र कायदा बनविण्यासाठी पुरेसे४० दिवसांत सरकार टिकणारे आरक्षण देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारने पुढे टिकणारे आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. कोणताही कायदा बनविताना पुराव्याची आवश्यकता आहे. जर राज्यात ५ हजार कुणबी प्रमाणपत्र सापडली असतील तर ते प्रमाणपत्र आरक्षणाचा कायदा बनविण्यासाठी पुरेसे आहे. समिती एका कागदावर आरक्षण देऊ शकते. आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटमला दिला आहे. ३० व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आहोत. आरक्षणापासून कोणीही आम्हाला वंचित ठेवू शकत नाही, घराघरातील मराठा जागा झाला असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड