बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. जवळपास ७५० जलकुंभ शुद्ध केले जाणार आहेत. पावसाळ्यात पिण्याचे पाणी निर्जंतुक करूनच पुरवठा केला जाईल याची खात्री ग्रामसेवक व जलसुरक्षकांनी करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे जलकुंभात पाणी पोहोचणे अशक्य होते. मात्र पावसाळा सुरू होताच दोन महिन्यापासून रिकाम्या असलेल्या जलकुंभात पाणी सोडण्यापूर्वी जलकुंभांचे शुद्धीकरण महत्वाचे असते. त्यादृष्टीने मोहीम हाती घेण्याचे आदेश त्यांनी दिले. या संदर्भात पाणी गुणवत्ता अभियान आरोग्य विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग परीक्षण प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची विशेष बैठकही घेण्यात आली.पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळ्यापूर्वी व त्यानंतर पाणी तपासणीच्या दोन मोहिमा वर्षभरात राबविण्यात येतात. जिल्ह्यात सर्व पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत मोहिमेमध्ये तपासले जातात. जिल्ह्यात १०३१ ग्रामपंचायतीपैकी किमान ७५० जलकुंभ वापरले जातात. क्लोरीन टाकून या सर्व हे सर्व जलकुंभांचे शुद्धीकरण करण्याचे काम सुरू आहे. गावातील जलसुरक्षक व ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीवर पावसाळ्यामध्ये शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे साथीचे रोग आजार पसरणार नाहीत याची दक्षता सर्व स्तरावर घेण्याची आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी येडगे यांनी दिले आहेत.गावातील नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित ठेवणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचा जवळ कुठल्याही प्रकारची सांडपाणी डबके साठणार नाही याची काळजी ग्रामपंचायतींनी घ्यावी तसेच पिण्याच्या पाण्या संबंधी काही अडचण तात्काळ आरोग्य विभाग पाणी गुणवत्ता अभियान व ग्रामीण पाणी पुरवठा विभागास तात्काळ कळवावे. सर्व जलस्रोत सुरक्षित व पिण्यायोग्य कायमस्वरूपी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात ७५० जलकुंभाची शुद्धीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:11 AM
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.
ठळक मुद्देजलस्रोतांची जैविक तपासणी । जलसुरक्षक, ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी सहभागी