शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

पतीपाठोपाठ ८ दिवसांत पत्नीचीही आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:13 AM

घरच्यांचा विरोध डावलून तीन वर्षापूर्वीच त्या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आठ दिवसांपूर्वी पतीने जाळून घेऊन आत्महत्या केली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

ठळक मुद्देबीडमधील घटना : एका प्रेमविवाहाची दुर्दैवी अखेर ! दोघांचाही एकाच जागेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरच्यांचा विरोध डावलून तीन वर्षापूर्वीच त्या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आठ दिवसांपूर्वी पतीने जाळून घेऊन आत्महत्या केली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. वेदना असह्य झाल्यानंतर ज्वालांनी वेढलेले शरीर घेऊन त्या महिलेने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या अंगावर चादर आणि माती टाकून आग विझवली. परंतु, तोपर्यंत ती महिला ९५ टक्के भाजली होती. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.माया अमोल अडागळे (वय २५, रा. नेकनूर, ता. बीड) असे जळीत महिलेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील माया हिचा नेकनूर येथील अमोल अडागळे याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातील लोकांचा विरोध झुगारून त्यांनी पळून जाऊन तुळजापूर येथे लग्न केले होते. लग्नानंतर ते बीडमधील शाहूनगर भागात राहू लागले.मागील आठवड्यात अमोलने स्वत:च्या गावाकडे असताना जाळून घेतले. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात त्याचा २८ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. अमोलच्या मृत्यूने मायाच्या मनावर खोल आघात केला. ज्या वार्डात पतीने प्राण सोडले त्याच ठिकाणी मी अंतिम श्वास घेणार, असे ती नातेवाईकांना बोलून दाखवू लागली.परंतु, दु:खावेगाने ती असे बोलत असावी, असे नातेवाईकांना वाटले. अखेर पतीचा विरह असह्य झालेल्या मायाने शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय गाठले. रात्री ८.४५ वाजता तिने ओपीडीच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून पेटवून घेतले.त्यानंतर वेदना असह्य झाल्याने ती किंचाळत रुग्णालयात धावली. तोपर्यंत तिला ज्वालांनी पूर्णपणे वेढलेले होते. रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना नेमका काय प्रकार सुरु आहे हे क्षणभर कळालेच नाही. नंतर ताबडतोब त्यांनी स्वत:ला सावरत मायाच्या अंगावर चादर आणि माती टाकून आग विझवली. परंतु, तोपर्यंत ती ९५ टक्क्यांपेक्षाही अधिक भाजली होती. तातडीने तिला जळीत कक्षात हलविण्यात आले. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अखेर, पतीचा ज्या वार्डात मृत्यू झाला होता त्याच वार्डात शनिवारी सकाळी मायाने देखील अंतिम श्वास घेतला आणि एका प्रेमविवाहाची दुर्दैवी अखेर झाली. बीड शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.क्षुल्लक कारणाने आयुष्याची राखरांगोळीमागील आठवड्यात एके दिवशी सकाळी अमोलने स्वत:च्या हाताने मायासाठी खिचडी तयार केली होती. परंतु, पोट दुखत असल्याने मायाने ती खिचडी खाण्यास नकार दिला. ही गोष्ट मनाला लागल्याने अमोलने स्वत:ला पेटवून घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. अमोलला वाचविण्याच्या प्रयत्नात मायाचे देखील हात भाजले होते. उपचारानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. अगदी छोटीशी गोष्ट एवढे गंभीर रूप धारण करेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. अमोलचा विरह तिला सहन होत नव्हता. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. मायाची कथा जाणून तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी देखील हळहळ व्यक्त करत होते.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्या