बीड : युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. संपात जिल्ह्यातील ९०० कर्मचारी सहभागी झाले होते.प्रलंबित वेतनवाढ, सेवाशर्तीमधील सुधारणा, पाच दिवसांचा आठवडा व इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी सकाळी बीड येथील जालना रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर निदर्शने करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या संपात एआयबीइए, एनसीबीई, एआयबीओसी, एआयबीईओ, बीएफएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू, एनबीओ या नऊ बॅँकिंग संघटनांशी संलग्न जिल्ह्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी एसबीआयएसयूचे डीजीएस माधव जोशी, एसबीआयओचे आरएस उमेश् आडगावकर, डीआरएस अमोल गायके, बीओएमईयूचे विपीन गिरी, गोविंद कुरकुटे, एसबीआयएसयूचे आरएस वैभव ढोले, एआरएस सुहास कटके व इतर सर्व राष्टÑीयकृत बॅँक कर्मचारी, अधिकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सरकारची चुकीची आर्थिक धोरणे व बॅँकांच्या तोट्याचे विश्लेषण यावेळी वक्त्यांनी केले. मोठ्या उद्योगातील थकित कर्जापोटी कराव्या लागणाºया तरतुदीमुळे बॅँका आॅपरेटिव्ह प्रॉफिटमध्ये असतानाही तोट्यात गेल्या आहेत. हेच नफा- तोट्याचे प्रश्न पुढे करत सरकार बॅँक कर्मचाºयांच्या वेतनवाढीवर निर्णय घेत नसून कर्मचाºयांच्या न्यायिक मागण्या नाकारल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.७० शाखा, ९०० कर्मचारीजिल्ह्यातील १५ राष्टÑीयीकृत बॅँकांच्या जवळपास ७० शाखा आहेत. तर ९०० अधिकारी व कर्मचारी आहेत. संपामुळे या शाखा बंद राहिल्याने शुक्रवारी जवळपास दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्याचबरोबर कर्जमाफी योजनेच्या अनुषंगाने होणारे कामही थांबले.
१५ बॅँकांचे ९०० कर्मचारी संपावर, दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:56 PM
युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
ठळक मुद्देएसबीआयसमोर निदर्शने : सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी; जिल्हाभरातील कामकाज ठप्प