बीड : शहरातील जालना रोड परिसरातील एका रुग्णालयाजवळील सिगारेट व बिस्किटांच्या गोदामातून तब्बल ९ लाखाचा माल चोरी गेल्याची घटना गुरुवारी सकाळी गोदाम उघडल्यानंतर निदर्शनास आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.मोंढा भागात महावीर बेदमुथा या व्यापाऱ्याचे भुसार मालाचे होलसेल दुकान आहे. त्यांच्या मालकीचे जालना रोड परिसरात सिगारेट व बिस्किटांचे गोदाम आहे. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी गोदाम फोडून प्रवेश केला आणि तब्बल ९ लाख रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स लंपास केले. सकाळी गोदाम उघडल्यानंतर हा प्रकार व्यापाºयाच्या लक्षात आला. त्यानंतर याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. यावेळी उपाधीक्षक भास्कर सावंत, शिवाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक अकलम शेख, स्थागुशाचे पो.नि.घनश्याम पाळवदे उपनिरीक्षक मीना तुपेसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच ठसे तज्ज्ञ, श्वान पथक, आयबाईकचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोदामाच्या आजूबाजूच्या परिसरातील पाहणी करुन पोलिसांनी चौकशी केली. जबरी चोºया होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, एक चोरटा गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला आहे. त्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
गोदाम फोडून ९ लाखांच्या सिगारेटी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:24 AM
शहरातील जालना रोड परिसरातील एका रुग्णालयाजवळील सिगारेट व बिस्किटांच्या गोदामातून तब्बल ९ लाखाचा माल चोरी गेल्याची घटना गुरुवारी सकाळी गोदाम उघडल्यानंतर निदर्शनास आली.
ठळक मुद्देबीडच्या जालना रोड परिसरातील घटना : शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा