शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

रुपया खर्च न करता बांधले ३७९ बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:53 PM

जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे.

ठळक मुद्देबीड जि. प. चा विशेष उपक्रम : लोकसहभागातून नदी, नाले, ओढ्यांलगत वनराई बंधारे, कोट्यवधी लिटर पाणी साठणार

बीड : जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे. वनराई बंधाऱ्याचे हे अभियान पुढील दोन आठवडे चालणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा आॅक्टोबरपर्यंत समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झाल्याने नदी, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून जलधारणा क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात एकाच दिवशी शुक्रवारी सकाळी निश्चित केलेल्या नदी, नाले, ओढ्याच्या ठिकाणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी पोहचले. श्रमदान करत वाळू, मातीने भरलेले पोते रचून काही वेळेतच बंधारे केले. बंधाºयामुळे परिसरातील शेत, विहिरी, बोअरची पातळी वाढून याचा फायदा गावालाच होणार असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. काही गावांमध्ये जितके शक्य होतील तितके बंधारे बांधण्यासाठी लोक तयार झाले आहेत. सध्या पाणी वाहते आहे ते अडवणे गरजेचे आहे. त्यामुळे महिला बचतगटही बंधारे बांधण्यासाठी सरसावले आहेत.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, प्रदीप काकडे, सी. एस. केकाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, कार्यकारी अभियंता वाघमोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एम. साळवे, कार्यकारी अभियंता काळे यांनी तालुका संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले.एक बंधारा २० हजार लिटर पाणी : साखळी बंधारे कराएका बंधाºयातून जवळपास २० हजार लिटर पाणी साठवणूक होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी. बी. गिरी यांनी सांगितले. धारुर तालुक्यातील कारी येथील नदीवर मोठा बंधारा ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारल्याचे ते म्हणाले.शिरुर कासार तालुक्यातील कान्होबाची वाडी येथे पंचायत समिती कर्मचाºयांनी तयार केलेल्या बंधाºयाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पाहणी केली.तालुक्यातील कामांबाबत पं. स. पदाधिकारी, ग्रामस्थ, यंत्रणेची प्रशंसा केली. सध्या वाहणारे पाणी शिवारात अडण्यासाठी पूर्ण तालुक्यात साखळी बंधारे करण्याचे आवाहन त्यांनी केले.सामुदायिक सहकार्याचे कराशुक्रवारी सकाळी बीड तालुक्यातील घाटसावळी येथे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि युवकांनी तयार केलेल्या वनराई बंधाºयाची पाहाणी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कौतुक केले.असे बंधारे आणखी उद्या व दोन आठवड्यात लोकसहभागातून उभारण्यासाठी सामुदायिक सहकार्याचे आवाहन कुंभार यांनी केले.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदWaterपाणी