बीड : मराठवाड्यातील मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित केली जात आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शोध घेतल्यानंतर १९१३ ते १९६७ या कालावधीतील ६३ गावांमध्ये कुणबी असल्याच्या ९१२ नोंदी आढळून आल्या होत्या. आता १९६७ ते २०२३ पर्यंत देण्यात आलेल्या कुणबी नोंदीचा शोध सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर, आष्टी व गेवराई या तालुक्यात कुणबी प्रमाणापत्रांच्या नोंदी सापडल्या होत्या. बीड तालुक्यातील आठ गावांमध्ये लावणीपत्रक गाव नमुना नं.६, गेवराई व शिरुर तालुक्यातील गावांमध्ये जन्म-मृत्यू नोंदवही, पाटोदा तालुक्यात खासरा पत्रक, जन्म-मृत्यू नोंद नमुना नं.१४, क पत्रक, खासरा पत्र, जनगणना रजिस्टर व कुणबी जात नाेंद असलेले शैक्षणिक पुरावे, आष्टी तालुक्यात गावांमध्ये गाव नमुना १४ जन्म-मृत्यू रजिस्टर, माजलगाव व वडवणी तालुक्यातील गावामध्ये क पत्रक व हक्क नोंदवही यावर कुणबीची नोंद आढळून आली आहे. सदरील सर्व कुणबी नोंदी या १९१३ ते १९६७ या कालावधीमधील आहे. आता १९६७ ते २०२३ पर्यंत देण्यात आलेल्या कुणबी नोंदींचा शोध सुरू आहे.
समितीस दिला जाणार अहवालमराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तिंना मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीस जिल्ह्यातील कुणबी नोंदीची माहिती सादर केली जाणार आहे.
नोंदणी आढळून आल्या १९६७ ते २०२३ या कालावधी जातीच्या नोंदी संदर्भातील माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कुणबीबाबतच्या नोंदणी आढळून आलेल्या अभिलेख्यांच्या छायांकित प्रतिसह विहित नमुन्यात खास दुतामार्फत पाठविण्याचे सांगितले आहे.-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड
कोणती घेतली जातेय माहितीजिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयांकडून निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार यासह इतर माहितीही १९१३ ते १९६७ या कालावधीतील आहे. त्यामुळे १९६७ ते १९७० पर्यंत, सन १९७१ ते १९८०, सन १९८१ ते १९९०, १९९१ ते २०००, २००१ ते २०१०, सन २०११ ते २०२० व सन २०२१ ते आतापर्यंत कुणबी जातीच्या नोंदणी संदर्भातील माहिती देण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
तालुका, कंसामध्ये एकूण नोंदी व दस्तावेज प्रकारवडवणी (२): पिंपरटक्का, पिंपरखेडमाजलगाव (२६): आनंदगाव, पात्रुड व सोन्नाखोटाआष्टी (८५): हाजीपूर, बीड सांगवी, देवीनिमगाव, डोंगरगणपाटोदा (६२८): तगारवाडी, महेंद्रवाडी, हनुमानवाडी, भुसनरवाडी, तिमलवाडी, सगळेवाडी, म्हाळाचीवाडी, पिंपळगाव धस, सदरवाडी, चंद्रेवाडी, आंबेवाडी, जरेवाडी, धोपटवाडी, गायकवाडी, जाधववाडी, घाळेवाडी, डोंगर किन्ही, कारेगाव, नाळवंडी, मांडवेवाडी, तुपेवाडी, कठाळवाडी, भाटेवाडी, जन्याची वाडी, राऊतवाडी, मळेकरवाडीशिरुर (९७): आर्वी, पांगरी, खोकरमोह, गोमळवाडा, राक्षसभुवनगेवराई (५८): मालेगाव खुर्द, सिरसमार्गबीड (१६): लिंबागणेश, राजुरी, येळंबघाट, अंधापुरी, सात्रा, साक्षाळपिंप्री