१५१ जणांची कोरोनावर मात
बीड: जिल्ह्यात काेरोनाचा वेग काही प्रमाणात कमी झाला असून, रुग्णसंख्या शंभरच्या आता आली आहे. २० ऑगस्ट रोजी नवे ९३ बाधित रुग्ण आढळले, तर १५१ जण कोरोनामुक्त झाले. दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.
१९ ऑगस्ट रोजी ५ हजार ३३५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ५ हजार २४२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ९३ जण बाधित आढळले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ०३, आष्टी तालुक्यात ३४, बीड तालुक्यात १८, धारुरमध्ये ०५, गेवराईत ०५, केजमध्ये ०६, माजलगावात ०२, पाटोद्यात १२, शिरुरमध्ये ०३ तर वडवणीत ५ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात १५१ जण कोरोनामुक्त झाले. मागील २४ तासांत दोन मृत्यूची नोंद झाली. धारुर शहरातील ७० वर्षीय पुरुष आणि आवरगाव (ता.धारुर) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. जुन्या दोन मृत्यूंचीही पोर्टलवर नोंद झाली.
दरम्यान, बाधितांचा एकूण आकडा १ लाख २४४ इतका झाला असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९५ हजार ७२८ इतकी आहे. आतापर्यंत २ हजार ६८८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या १ हजार ८२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
---------