बीड : मागील पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. १०२७ पैकी ९७४ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत विविध माहिती संकलित केली. उर्वरित शेतकºयांच्या कुटुंबियांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे.
जिल्ह्यात ५ वर्षांत १०२७ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र/अपात्र शेतकºयांच्या कुटुंबियांची महसूल विभागाने बुधवारी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांत किती सदस्य आहेत, योजनांचा लाभ मिळाला का, मुलांचे शिक्षण, लग्न, उत्पन्न आदी गोष्टींची माहिती संकलित केली. घरातील कर्ता गेल्यानंतर खचलेल्या कुटुंबियांना प्रोत्साहन देऊन ‘दिलासा’ देण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून सुरु आहे.
निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व अधिकाºयांनी ही माहिती संकलित केली आहे. उर्वरित ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट झाली नाही. पैकी काही कुटुंबे स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांची माहिती संकलित करणे सुरु आहे. दोन दिवसात सर्व अहवाल पूर्ण होईल. ७ डिसेंबर रोजी तो विभागीय आयुक्तांना देणार असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.