- मधुकर सिरसटकेज (बीड) : केज- अंबाजोगाई महामार्गांवर होळ शिवारात सूतगिरणीजवळ बुधवारी रात्री एका दुचाकी रस्त्यातील विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. शंकर फकिरा धोत्रे असे मृत मजुराचे नाव आहे.
शंकर फकिरा धोत्रे (40, रा. मागाव जिल्हा यवतमाळ ) हे नांदुरघाट परिसरातील रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करतात. बुधवारी रात्री शंकर दुचाकीवरून ( क्र. MH 29 / BY 0389) नांदूरघाटकडे निघाले होते. केज- अंबाजोगाई महामार्गांवर होळ शिवारात रस्त्यावरील विजेच्या खांबाला दुचाकी धडकली. यात शंकर गंभीर जखमी झाले. दरम्यान, खाजगी रुग्णवाहिकेचे चालक संतोष वळसे यांनी शंकर यांना केज येथील उप जिल्हारुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी शंकर यांना तपासून मृत घोषित केले.