शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

धोकादायक वळणावर कार पुलावरून कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 2:00 PM

राजस्थानवरून परतणाऱ्या जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर काळाचा घाला

- अविनाश कदमआष्टी ( बीड) : जामखेड-बीड-अहमदनगर महामार्गावर आज सकाळी पोखरी गावाजवळील धोकादायक वळणावर पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. यात जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून महेंद्र बोरा ( ५८ ) यांचा मृत्यू झाला. तर बोरा कुटुंबातील अन्य तिघे गंभीर जखमी असून एकजण किरकोळ जखमी आहे.  

जामखेड शहरातील भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा कुटुंबासमवेत राजस्थानला देवदर्शनाला गेले होते. मंगळवारी रात्री विमानाने बोरा कुटुंब पुणे विमानतळावर आले. तेथून स्वतःच्या कारने (एम. एच.१६ ए. टी ८८०७ ) सर्वजण आज पहाटे जामखेडकडे निघाले होते. दरम्यान, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरला पोखरीजवळ सोडून बोरा यांचा मुलगा भूषण गाडी चालवत होता. काही अंतर पुढे जाताच धोकादायक वळणावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार पुलावरून खाली कोसळली.

अपघातात महेंद्र बोरा यांचा जागीच मृत्यू  झाला. तर कारमधील पत्नी रेखा महेंद्र बोरा (५२), सून जागृती भूषण बोरा ( २८), नात लियाशा भुषण बोरा (६) हे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक फौजदार नामदेव धनवडे, पोका भरत गुजर, बी. ए. वाणी यांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तातडीने जामखेड येथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी नगरकडे रवाना करण्यात आले. मुलगा भुषण शांतिलाल बोरा ( ३४ ) हा किरकोळ जखमी आहे. दरम्यान, जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर महेंद्र बोरा यांच्यावर सायंकाळी ५ वाजता तपनेश्वर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात