बीड: शहरातील नगर रोडवर सुयाेग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (रा.बीड) हा गावठी कट्टा विक्रीसाठी आला होता. ही माहिता स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास सापळा लावला. चार वाजता छोट्या येताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
त्याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छोट्यावर यापूर्वीही अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सोबतच दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यातही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, देवीदास जमदाडे, विकी सुरवसे, नारायण कोरडे, अशोक कदम, आदींनी केली.