शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात नोटा; पोलीस उपनिरीक्षकासह अंमलदार लाचेच्या सापळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:16 PM

औरंगाबादच्या पथकाची बीडमध्ये कारवाई, शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास रंगेहाथ पकडले.

बीड : विनयभंगाच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणी करुन २५ हजार रुपयांची तडजोड केली. त्यातील १० हजार स्वीकारले, उर्वरित १५ हजार रुपयांची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबादेतील पथकाने शहरातील बसस्थानकासमोर एका हॉटेलात ५ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजता ही कारवाई केली. उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड व अंमलदार विकास सर्जेराव यमगर अशी त्यांची नावे आहेत. 

राजू गायकवाड यांना चार महिन्यांपूर्वीच ग्रेड उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होेती. ते शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. १७ ऑक्टोबरला शिवाजीनगर ठाण्यात तक्रारदारावर विनयभंगाचा गुन्हा नाेंद आहे. हे प्रकरण ब फायनल करण्यासाठी उपनिरीक्षक राजू गायकवाड व त्यांचे लेखनिक अंमलदार विकास यमगर यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी दहा हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित रकमेची मागणी झाली, पण तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

यानंतर औरंगाबादच्या पथकाने ५ डिसेंबरला बसस्थानकासमोरील हॉटेलातलाचमागणी पडताळणी केली, यात तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी मान्य केले. चहा घेत असतानाच तक्रारदाराकडून उर्वरित १५ हजार रुपये गायकवाड यांनी स्वीकारले. त्यानंतर एसीबी पथकाने झडप मारून दोघांनाही पकडले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. औरंगाबाद एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर अधीक्षक दिलीप साबळे, उपअधीक्षक जी. पी. गांगुर्डे, अंमलदार दिगांबर पाठक, भीमराज जिवडे, शिरीष वाघ, चालक चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

ड्युटी संपेपर्यंत वाट पाहिली...तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून ५ डिसेंबरला ते ड्युटीवर होते. इकडे उपनिरीक्षक राजू गायकवाड हे ठाण्यात कर्तव्यावर होते, तर अंमलदार विकास यमगर निवडणूक कामाच्या ड्युटीवर होते. सायंकाळी पाच वाजेनंतर त्या तिघांची बसस्थानकासमोरील हॉटेलात भेट ठरली. औरंगाबादचे पथक सकाळीच बीडमध्ये पोहोचले होते. लाच मागणी व सापळा यशस्वी व्हावा, यासाठी पथकाने तिघांचीही ड्युटी संपेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सापळा यशस्वी करूनच पथक औरंगाबादला परतले.

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीड