- नितीन कांबळेकडा : वर्ष, सहा महिने नव्हे तर तब्बल सहा वर्ष अनवाणी फिरणाऱ्या एका तरूणाने आपल्या नेत्यावर असलेले प्रेम व्यक्त करत चक्क सहा वर्षांनंतर बोललेला ‘निर्धार’ पूर्ण करत त्याच्याच हाताने चप्पल घालून इच्छापूर्ती झाल्याचे दिसून आले.
आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील माउली बांदल या तरूणाने सुरेश धस जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील तेव्हाच पायात चप्पल घालीन नसता अनवाणी राहील, असा निर्धार २०१८ पासून निर्धार केला होता. वर्ष, सहा महिने नव्हे तर तब्बल तो तरूण सहा वर्ष अनवाणी फिरत होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस निवडून आल्यानंतर स्वत: त्यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला आष्टी येथील निवासस्थानी बोलावून नवीकोरी चप्पल घालून त्याने केलेला निर्धार पूर्ण केला.
माझी इच्छापूर्ती झालीसुरेश धस किंवा कुटुंबातील कोणी आमदार झाले तरच मी पायात चप्पल घालेन हा निर्धार केला होता. याला सहा वर्ष झाले. सुरेश धस आमदार झाले तेव्हाच हा निर्धार पूर्ण केला. याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे माउली बांदल याने लोकमतशी बोलताना सांगितले.