- मधुकर सिरसाटकेज :केज राखीव मतदार संघात २५ उमेदवार मैदानात आहेत. परंतू नेता आणि त्यांच्या कार्यकर्त्यातच थेट दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
२०१२ साली राष्ट्रवादीच्या स्व. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत उभे करण्यासाठी त्यांचा कार्यकर्ता पृथ्वीराज साठे यांची शिफारस अक्षय मुंदडा आणि नंदकिशोर मुंदडा यांनी शरद पवार यांच्याकडे केली. या निवडणुकीची प्रचार यंत्रणा व आमदार झाल्यानंतर संपर्क कार्यालयही मुंदडा यांच्या बंगल्यातूनच चालत होते. त्यामुळे मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांचे नेता व कार्यकर्ता असेच नाते आहे. या निवडणुकीत महायुतीकडून नमिता मुंदडा तर महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे रिंगणात आहेत. या मतदार संघात ११ राजकीय पक्षांसह १४ अपक्ष असे २५ उमेदवार असले तरीही या नेत्या आणि कार्यकर्त्यातच दुरंगी लढतीकडेच लक्ष लागले आहे.
तीन पत्रकारही मैदानातकेज राखीव विधानसभा मतदार संघात एकूण तीन पत्रकारही आपले नशीब अजमावत आहेत. यात संजय होळकर, वैभव स्वामी आणि साहस आदोडे यांचा समावेश आहे.
आडसकरांची भूमिका गुलदस्त्यात !केज विधानसभा मतदार संघात रमेश आडसकर यांची ताकद निर्णायक मानली जात असून ही ताकद ज्यांच्या पारड्यात पडेल त्यांचे पारडे जड होणार आहे. त्यामुळे रमेश आडसकरांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजारा सध्या लागल्या आहेत. भाजपा आ.नमिता मुंदडा यांच्या बद्दलही त्यांच्यात आणि कार्यकर्त्यात नाराजी आहे, तर उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने रमेश आडसकरांनी शरद पवार गटात प्रवेश केला असला तरी ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांच्यावरही कार्यरक्ते व समर्थक नाराज आहेत. माजलगाव मतदार संघात आडसकरांना ज्यांची मदत मिळेल त्यांच्या बाजूने केज मतदार संघात ते भूमिका घेणार असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप ही आडसकरांची भूमिका गुलदास्त्यात असल्यामुळे ते केज मतदार संघात कोणती भूमिका घेतात यावर केज केज सभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.