- नितीन कांबळे
कडा- शेतात भटकंती करताना दोन दिवसांपूर्वी अचानक सात परस खोल विहिरीत एक दुर्मीळ कस्तूरी मांजर पडले. आज प्राणीमित्रांनी त्या दुर्मीळ कस्तूरी मांजराला बाहेर काढत निसर्गाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले आहे.
आष्टी तालुक्यातील रूटी इमनगाव येथील राहुल गाडे यांच्या शेतातील विहीरीत दोन दिवसांपूर्वी एक दुर्मिळ कस्तुरी मांजर पडलेले होते. आज सकाळी विहीरीकडे गेल्यावर त्यांना हे मांजर पडल्याचे आढळून आले. गाडे यांनी कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे, गणेश पवळ, राजू भोजने व वनविभागाचे कर्मचारी अशोक काळे यांनी आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान शेतात धाव घेतली. प्राणीमित्रांनी विहिरीत उतरून कस्तूरी मांजराला बाहेर काढले. त्यांनंतर मांजराला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देत जीवदान दिले.