शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

एका ट्रॅक्टर चोरीच्या तपासात, चार ट्रॅक्टरची चोरी झाली उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 6:39 PM

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील एकूण चार ट्रॅक्टरची चोरी करून ते भंगारात विकून नष्ट केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : तालुक्यातील कोरेगाव येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी केज पोलिसांनी कळंब पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत. चौकशीत कोरेगावच्या ट्रॅक्टर चोरीची तर कबूली दिलीच परंतु, दोन महिन्यात चार ट्रॅक्टर चोरल्याचेही आरोपींनी सांगितले. जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरीचे आणखीन ही गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरेगाव येथील अजमेर रसूल तांबोळी यांनी दि. 8 जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (एम एच -24 / डी - 4865 ) हे कोरेगाव येथील केज-बीड रस्त्या लगतच्या भाई- भाई वेल्डिंग वर्कशॉप समोर उभे केले होते. ते दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान चोरीला गेले होते. याप्रकरणी अजमेर तांबोळी यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. 09/2023 भा. दं. वि. 379 नुसार गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान, उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणात विकास बापूराव भालेकर, (रा.तांदळवाडी जि.उस्मानाबाद), मुस्तफा नासेर सय्यद, (रा.कळंब ) आणि मोबीन मोहसीन सय्यद (रा. नेकनूर ) यांना पकडून कळंब पोलीसांच्या ताब्यात दिलेले होते. आरोपीची तेथील  पोलीस कोठडी संपताच  पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक देवकते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत चार जिल्ह्यातील चोरींच्या घटना उघडकीस झाल्या आहेत.

भंगारात विकले ट्रॅक्टरलातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील एकूण चार ट्रॅक्टरची चोरी करून ते भंगारात विकून नष्ट केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

चार ट्रॅक्टरच्या चोरीची दिली कबुली- एकूरगा, जि लातूर येथील शंकर श्रीरंग गाडे यांचे दि 15/11/2022 रोजी न्यू हॉलंड (एम एच-25 / ए एस-2019) हे ट्रॅक्टर चोरले होते. गुन्हा मुरुड पोलिसात नोंद.- कळंब, जि उस्मानाबाद येथील अक्षय शंकर जावळे यांचे दि. 11/12/2022 रोजी सोनालिका छत्रपती ट्रॅक्टर (एम एच -25 / ए एच - 1969) चोरले होते. गुन्हा कळंब पोलिसात दाखल- हावरगाव ता कळंब जि उस्मानाबाद येथील अण्णासाहेब भास्कर कोल्हे यांचे सोनालिका एम एच 25 / ए एस - 7260 हे ट्रॅक्टर दि. 5/1/2023 रोजी चोरले. गुन्हा कळंब पोलीसात दाखल- कोरेगाव ता केज येथील अजमेर रसूल तांबोळी यांचे दि.दि. 8 जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (एम एच-24 / डी - 4865) हे चोरले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड