शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस

By सोमनाथ खताळ | Published: July 09, 2024 12:09 PM

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; नऊ दिवसांत ४ लाख वारकऱ्यांवर उपचार

बीड : पंढरीच्या वाटेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' ही मोहीम राबवली आहे. मागील ९ दिवसांत ४ लाख १४ हजार ३९६ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. पाय मुरगळला, चक्कर आली की आरोग्यातील डॉक्टर, कर्मचारी हे देव बनून सेवा देत आहेत.

राज्यातील एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी होऊन १२ लाख ४१ हजार वारकरी हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' ही मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांची सेवा करत आहेत.

तात्पुरत्या रुग्णालयातून २३२७ रुग्णांवर उपचारपालखी किंवा दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले आहे. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात. आतापर्यंत २ हजार ३२७ वारकऱ्यांना ॲडमिट करून सेवा दिली आहे.

'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. आतापर्यंत ४ लाख १४ हजार वारकऱ्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे. २३२७ रुग्णांना तात्पुरते रुग्णालय व जवळच्या संस्थेत ॲडमिट करून उपचार केले. वारकऱ्यांची सेवा करताना मनस्वी आनंद होत आहे. नोडल अधिकारी म्हणून संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.- डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे

कोणत्या पालखीतील वारकऱ्यांची सेवापालखीचे नाव - बाह्यरुग्ण संख्या - अंतररुग्ण संख्याश्री संत गजानन महाराज मंदिर - १३१४० - ५९श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर - १२३५- ४श्री संत मुक्ताबाई मुक्ताईनगर - ३८०६ - ०श्री संत निवृत्तीनाथ महाराज - १४२६८ - ६०श्री संत जनार्धन स्वामी - १८० - ०श्री संत ज्ञानेश्वर महाराज - २१२४२४ - ९३९श्री संत तुकाराम महाराज - १४४९४४ - १२५०श्री संत मुक्ताबाई मेहून - ३०७४ - १श्री संत एकनाथ महाराज पैठण - १९३१ - ३श्री संत नामदेव महाराज - २६१८ - २श्री संत सोपानकाका महाराज - १०१२० - ७श्री संत निळोबाराय महाराज - ९४१ - २इतर दिंडी - ८७० - ०१०८ रुग्णवाहिका - २५१८ - ०एकूण - ४१२०६९ - २३२७

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीBeedबीडHealthआरोग्य