यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची स्थिती चांगली सुधारली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असता शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे लगबगीने गहू, हरभरा या पिकांची काढणी शेतकरी लगबगीने काढून घेत असल्याचे शेतकरी दिसत आहेत. खरीप पिकाप्रमाणे, रब्बी पीक हातचे जाऊ नये म्हणून शेतातील गहू, हरबरा, ही पिके काढण्याची लगबग शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जर सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर तोंडी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. खरिपाचे सोयाबीन पीक व्यवस्थित असताना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यानी रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके पेरण्यास पसंती दिली. उत्पन्न बऱ्यापैकी होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
हरभरा काढणीची लगबग; काढणीच्या दरात दीडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:33 AM