चालकांची कसरत, खड्डयांतून मार्ग
वडवणी : हरिश्चंद्र देवस्थानांत जाणारा मुख्य रस्ता चिंचोटी गावापर्यंत रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडे पडल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
बसअभावी खासगी वाहनाने प्रवास
वडवणी : तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना ये-जा करण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून खासगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करत आहेत.
बाजारात गर्दी
वडवणी : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागत असल्याने खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. शेतकरी बियाणे, खते, अवजारे खरेदीसाठी कृषी दुकानात गर्दी करत असून कापूस, सोयाबीन, तूर ,मूग या पिकांची लागवड व पेरणीसाठी लगबग सुरू असल्याचे दिसत आहेत.