माजलगाव : येथील नगरपालिकेंतर्गत विविध रस्त्याचे काम न करताच, १ कोटी ६१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १४ महिन्यांपासून फरार मुख्याधिकारी बी.सी. गावीत हे शुक्रवारी स्वत: पोलिसांना शरण आले.
येथील नगरपालिकेत १ कोटी ६१ लाखांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावीत व नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०१६ पूर्वी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या काळात विविध रस्त्यांसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर, तत्काळ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्यानंतर, सहाल चाऊस हे नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळी मुख्याधिकारी बी.सी. गावीत हे होते. या दोघांनी व लेखापालाने संगनमत करून २०१७ मध्ये काम न करताच उचलली होती.
डिसेंबर, २०१९ मध्ये रुजू झालेले प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी विवेक जॉनसन यांनी या प्रकरणी मुख्याधिकारी व दोन लेखापालांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, गावीत हे फरार झाले होते, तर मार्च, २०२० मध्ये नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावरही आरोपानुसार गुन्हा दाखल व अटक झाली होती. त्यानंतर, चाऊस हे अटकेत होते. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता, तर मुख्याधिकारी गावीत हे शुक्रवारी सकाळी आष्टी येथील पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
260221\purusttam karva_img-20210226-wa0028_14.jpg